Top
Home > News Update > कंगनाचं ट्वीटर अकाउंट सस्पेंड, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...

कंगनाचं ट्वीटर अकाउंट सस्पेंड, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...

कंगनाचं ट्वीटर अकाउंट सस्पेंड, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
X

आपल्या वादग्रस्त ट्वीटने कायम चर्चेत राहणाऱ्या कंगना राणावतचं ट्वीटर अकाउंट ट्विटरने अखेर निलंबीत केलं आहे. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर कंगना राणावतचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलं आहे. कंगना ने ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात असंसदीय शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती.

भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर कंकना ने तृणमूल कॉंग्रेस चे लोक महिलांना मारत असल्याचा दावा केला होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2000 सालचं विराट रुप धारण करुन ममताला आटोक्यात आणण्याचा आग्रह करत होती.

तिच्या या ट्वीटनंतर मोठा बवाल झाला आणि तिचं अकांउट सस्पेंड करण्यात आलं आहे. कंगनातं अकाउंट ब्लॉक करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

गुरुजी या अकाउंटवरुन एक गाणे ट्वीट करण्यात आलं असून कंगनासह ट्विटमध्ये हृतिक रोशन चा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

Press Trust Of India या Parody अकाउंटवरुन संजय राऊत यांचा पेटी वाजवल्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Dr. Sastey Kumar यांनी काही लोकांचा फोटो टाकला असून भक्त आता कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जात असल्याचं म्हटलं आहे.

शाह या अकाउंटवरुन कंगनाचं अकाउंट डीलिट झाल्यानंतर संजय राऊत सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा डान्स करणारा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

kangana ran-out या अकाउंटवरुन मोदी समर्थक असणाऱ्या अक्षय कुमार, अनुपम खेर यांचा फोटो ट्वीट केला आहे. सोबत परेश रावल यांना देखील दाखवण्यात आला आहे.

Shuaib या अकाउंटवरुन अमरीश पुरी ह्रतिक रोशन यांचा फोटो ट्वीट केला आहे.

Munna Bhai Mbbs या parody अकाउंटवरुन संजय दत्त चा फोटो ट्वीट केला आहे.

Updated : 2021-05-04T15:44:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top