Home > News Update > प्रेसकार्ड दाखवलं नाही म्हणुन पोलिस अटक करु शकत नाही - मनदीप पुनिया

प्रेसकार्ड दाखवलं नाही म्हणुन पोलिस अटक करु शकत नाही - मनदीप पुनिया

सिंघू सीमेवरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेला मुक्त पत्रकार मनदीप पुनिया याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महानगर दंडाधिकारी अखिल मलिक यांनी रविवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. तपास अधिकारी हजर नसल्याने पुनियाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रेसकार्ड दाखवलं नाही म्हणुन पोलिस अटक करु शकत नाही - मनदीप पुनिया
X

शेतकरी आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्य़ा मुक्त पत्रकार मनदीप पुनिया यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या विरोधात आईपीसी कलम 186, 323 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. पुनिया यांच्यासह पत्रकार धर्मेंद्र सिंह यांना देखील अटक करण्यात आली होती. पुनिया यांच्या जमीनावर महानगर दंडाधिकारी अखिल मलिक यांनी रविवारी सुनावणी केली व तपास अधिकारी हजर नसल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनदीप पुनिया यांनी आपल्या जमीन याचिकेत म्हटलं आहे की, एफआयआर दाखल करण्यास सात तास उशीर केला गेला. व माझा सोबत अटक केल्याल्या दुसऱ्या पत्रकाराला सोडून दिलं होत पण त्याच्याकडे माध्यमाचे ओळखपत्र नसल्यामुळे तो अजूनही अटकेत आहे. मुक्त पत्रकारिता करत असताना प्रेस ओळखपत्र न बाळगणे हा त्याच्यावर केस किंवा अटक करण्याचा आधार असू शकत नाही.

यामध्ये पुढे पुनिया यांनी त्यांच्या विरोधात नोंद केलेल्या एफआयआर मध्ये विरोधाभास आल्याच म्हणत त्या संदर्भात व्हिडिओ स्वरूपातील पुरावा देखील आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.

Updated : 1 Feb 2021 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top