Home > News Update > जॉन्सन बेबी पावडरचा परवाना कायमचा रद्द

जॉन्सन बेबी पावडरचा परवाना कायमचा रद्द

जॉन्सन बेबी पावडरचा परवाना कायमचा रद्द
X

जॉन्सन एँड जॉन्सन कंपनीने काही दिवसांपुर्वी त्यांच्या बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता भारत सरकारने या कंपनीच्या पावडर उत्पादनाचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जॉन्सन बेबी पावडर ही लहान मुलांसाठी धोकादायक आहे तिच्यामुळे कॅन्सर होतो असा निकाल २०१८ मध्ये अमेरिकेतील सेंट लुईस कोर्टाने दिला होता. त्यानंतर जगभरात ही बातमी पसरली होती. कॅनडा आणि अमेरिकेने लागलीच या पावडरच्या विक्रीवर बंदी आणली होती. पण इतर देशांमध्ये या पावडरचं उत्पादन आणि विक्री सुरूच होती पण काही दिवसांपुर्वी या कंपनीने स्वतःच जगभरातील बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण ते कालांतराने काही बदल करून त्यांचं हे उत्पादन पुन्हा बाजाराच विक्रीसाठी आणणार होते. पण अशात भारत सरकारने त्यांचा उत्पादनाचा परवाना कायमचा रद्द केला आहे.

जॉन्सन बेबी पावडरचे दोन नमुने भारत सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने पुणे आणि नाशिक येथील प्रयोगशाळांमध्ये गुणवत्ता चाचणीसाठी पाठवले होते. त्यानंतर उत्पादन पध्दतीमध्ये दोष असल्याचं कारण देत कंपनीला प्रशासनाने अखेरची नोटीस पाठवली. यानंतर कंपनीने पुन्हा फेर चाचणी कऱण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे नमुने कोलकाता येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते पण तिथेही चाचणी नकारात्मक आल्याने भारत सरकारच्य़ा अन्न व औषध प्रशासनाने बेबी पावडर या उत्पादनाचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated : 17 Sep 2022 8:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top