Home > News Update > असहमत आहात तर युध्द का? जो बायडेन यांच्या भाषणातील 9 जोरदार पंच

असहमत आहात तर युध्द का? जो बायडेन यांच्या भाषणातील 9 जोरदार पंच

असहमत आहात तर युध्द का? जो बायडेन यांच्या भाषणातील 9 जोरदार पंच
X

अमेरिकेच्या 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन (Joe Biden) यांनी पदभार स्विकारला आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटल हिल मध्ये झालेल्या समारंभात बायडेन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. बायडेन यांनी या शपथ सोहळ्यानंतर केलेल्या भाषणात अमेरिकेच्या गौरवाचा उल्लेख केला. या वेळी त्यांनी देशातील जनतेला आपण सर्वांचे राष्ट्रपती असल्याची घोषणा केली.

'हा लोकशाहीचा दिवस आहे. हा अपेक्षांचा दिवस आहे. आज एका उमेदवाराचा विजय नाही. एका ध्येयांचा विजय आहे. हा लोकांच्या इच्छेचा सन्मान आहे.' असं म्हणत त्यांनी त्यांची ध्येय धोरणं स्पष्ट केली. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अमेरिका कोणत्या एका व्यक्तीची नाही. काही लोकांची देखील नाही. ती सर्वांची आहे. मी सर्वांचा राष्ट्रपती आहे.

आपल्याला खूप काही गोष्टी चांगल्या करायच्या आहेत. खूप काही गोष्टी पुन्हा पुर्ववत करायच्या आहेत. अमेरिकेने अशा गोष्टींचा सामना कदाचित कधी केला नसेल. अशी परिस्थिती आहे. राजकारणात कट्टरतावाद वाढला आहे. काळा गोरा भेद, देशाअंतर्गत दहशतवाद वाढला आहे. आपल्याला याचा सामना करायचा आहे. आपण त्याला हरवू. आपण एकमेकांचे शत्रू नाही. एकमेकांकडे शेजाऱ्यासारखं पाहा. जर आपण एक झालो तर आपण कधीही हरू शकत नाही.

प्रत्येक असहमती युध्दाचं कारण व्हावं, हे नेहमी गरजेचं नसतं. कमला हॅरिस पहिल्या उपराष्ट्रपती झाल्या आहेत. तुम्ही कसं म्हणू शकता गोष्टी बदलू शकत नाही. आपल्याला त्या संस्कृतीला हरवायचं आहे. जिथं खऱ्याचं खोटं केलं जातं. खोटं उगवलं जातं. आपल्याला जगाला सांगायचं आहे. की आम्ही आमच्यामधील खराब झालेले संबंध ठीक ठाक करत आहोत.

Updated : 23 Jan 2021 7:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top