Home > News Update > नोकरीच्या संधी ; 10.45 लाखांहून अधिक रिक्त पद

नोकरीच्या संधी ; 10.45 लाखांहून अधिक रिक्त पद

नोकरीच्या संधी ; 10.45 लाखांहून अधिक रिक्त पद
X

नवी दिल्‍ली : देशातील नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरी शोधणे आणि योग्य नोकरी मिळणे, करियरविषयक मार्गदर्शक सल्ला, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांविषयी माहिती इत्यादी करियरशी संबंधित विविध सेवा डिजिटल मंचाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता याव्या म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टल [www.ncs.gov.in] सुरु केले आहे. योग्य व्यक्तीला योग्य पदावरील नोकरी मिळावी या हेतूने एनसीएस पोर्टल नोकरीच्या शोधात असणारे आणि नोकऱ्या देणारे यांना एका मंचावर घेऊन येते, देशातील आकांक्षित युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. या पोर्टलच्या माध्यमातून करियर विकासासाठी मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एनसीएस पोर्टलची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

नोकरी शोधणाऱ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 1100 हून अधिक मान्यताप्राप्त करियर सल्लागार

3600 हून अधिक प्रकारच्या नोकऱ्यांबाबत करियरची माहिती देणारा माहितीकोष

रोजगारविषयक पात्रतेच्या चाचणीसाठी ऑनलाइन रोजगार पात्रता कौशल्य मूल्यमापन

डिजिटल आणि इतर सॉफ्ट स्किल्ससाठी ऑनलाइन रोजगार पात्रता सुधारण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाची सुविधा

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची माहिती सामायिक करण्यासाठी 28 राज्यांच्या (एनसीएसचा थेट वापर करणाऱ्या 7 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह) रोजगार पोर्टल्सचे एकत्रीकरण

रिक्त पदांच्या सामायीकीकरणासाठी विविध खासगी रोजगार पोर्टल्सशी एकत्रीकरण

नियोक्त्यांचे ऑटो रजिस्टरिंग करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे उद्यम पोर्टल, ईपीएफओ आणि ईएसआयसी यांच्यासह एकत्रीकरण

दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार, एनसीएस पोर्टलवर 10.45 लाखांहून अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षांत नोंदणी झालेले नियोक्ते आणि रिक्त पदे यांचे वर्षनिहाय तपशील खाली दिला आहे


वर्ष

नियक्ती

रिक्त पद

2020-21

78 हजार 367

12 लाख 61 हजार 066

2021-22

52 हजार 863

13 लाख 46 हजार 765

2022-23

8 लाख 19 हजार 827

34 लाख 81 हजार 944


केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे.

Updated : 22 Dec 2023 6:41 AM GMT
Next Story
Share it
Top