Home > News Update > जेएनयू अपडेट – गेटवे इथून आंदोलक विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलवलं

जेएनयू अपडेट – गेटवे इथून आंदोलक विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलवलं

जेएनयू अपडेट – गेटवे इथून आंदोलक विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलवलं
X

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी आझाद मैदानात हलवलं आहे. गेट वे ऑफ इंडिया इथल्या आंदोलनामुळे सामान्य लोक आणि पर्यटक अशा दोघांना त्रास होत आहे, त्यामुळे आंदोलकांची रवानगी आझाद मैदानात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

हे ही वाचा...

JNU मध्ये दहशतवादी हल्लाच! – उद्धव ठाकरे

JNU Updates: देशभरातून हल्ल्याचा निषेध

JNU Updates: देशभरातून हल्ल्याचा निषेध

आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची गर्दी वाढत असल्यानं पोलिसांनी त्यांना आझाद मैदानात जाण्यास सांगितले. रविवारी जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झालेत. देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध होतोय. पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असती तर हल्लेखोरांना रोखता आलं असतं असाही आरोप विद्यार्थी संघटनेनं केलाय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/3355001144570736/

Updated : 7 Jan 2020 4:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top