Home > News Update > महेश आहेर याने माझ्या मुलीला ठार मारण्याची दाऊद गँगला सुपारी दिली : जितेंद्र आव्हाड

महेश आहेर याने माझ्या मुलीला ठार मारण्याची दाऊद गँगला सुपारी दिली : जितेंद्र आव्हाड

महेश आहेर याने माझ्या मुलीला ठार मारण्याची दाऊद गँगला सुपारी दिली :  जितेंद्र आव्हाड
X

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या ८ तासांच्या ऑडियो क्लिप्स आहेत. यात माझ्या मुलीला ठार मारण्याची दाऊद गँगला सुपारी दिल्याचं बोललं होतं पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला आहे. वरिष्ठ अधिकारी आहेरच्या पाठिशी आहेत का ? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

ठाणे महानगर पालिकेचे (Thane Mahanagar Palika) अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश (Mahesh Aher) आहेर यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या कुटुंबियांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तथा आव्हाड समर्थकांनी महापालिका मुख्यालयात गेटवर मारहाण केली होती. या प्रकरणी महेश आहेर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आव्हाड यांच्यासह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड ( Rhuta Avhad ) आणि मुलगी नताशा आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या नावे असलेल्या ऑडिओ क्लिप च्या सहाय्याने आपल्या जीविताला धोका असल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. मारहाण प्रकरण आणि कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी आव्हाड यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दोन पेन ड्राईव्ह दाखवले आणि दावा केला की, “यामध्ये महेश आहेर या अधिकाऱ्याच्या ८ तासांच्या ऑडियो क्लिप्स आहेत. यातल्या काही निवडक क्लिप्स आम्ही बाहेर काढल्या आहेत. परंतु खरा बॉम्बस्फोट अजून बाकी आहे.”

आव्हाड म्हणाले की, “महेश आहेर याने माझ्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली, दाऊद गँगला सुपारी दिल्याचं बोललं होतं. त्यानंतर मला वाटलेलं की संवेदनशील सरकार यावर काहीतरी कारवाई करेल. किमान त्याची बदली करेल. परंतु तसं काही झालं नाही. उलट सरकारकडून सांगण्यात आलं की, या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला देऊन तपास करणार.”

“आता महेश आहेर याची नवीन ऑडिओ क्लिप आली आहे. यामध्ये तो पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय. तो म्हणतोय की मी टाईट होऊन (मद्यप्राशन करून) मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) फोन केला. मी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतोय.” आव्हाड म्हणाले की, “तो असं फोनवर बोलत असला तरी मला खात्री आहे की, मुख्यमंत्र्यांना यातलं काही माहिती नसेल, कारण मी त्यांना जवळून ओळखतो. परंतु हे आजुबाजूचे जे चमचे आहेत त्यांच्यामुळे मुख्यमंत्री त्रस्त आहेत.”

आव्हाड म्हणाले की, “आहेर फोनवर कोणाला तरी सांगतोय की, मी टाईट होऊन मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी तो फोन उचलला. त्यानंतर मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आले. अधिकारी मला म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.” कथित ऑडिओ क्लिप मध्ये आहेर काय म्हणाले .

आव्हाड म्हणाले की, “आहेर फोनवर कोणाला तरी सांगतोय की, मी टाईट होऊन मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी तो फोन उचलला. त्यानंतर मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आले. अधिकारी मला म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.”

Updated : 15 March 2023 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top