Home > News Update > जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला टोला

जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला टोला

कळव्यामध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याबद्दल जो गुन्हा दाखल केला तो अत्यंत चुकीचा असून गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करा, जर घोषणा देणे गुन्हा असेल तर आम्हीही पोलिस ठाण्यात घुसून घोषणा देऊ, असा इशारा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला टोला
X

ठाणे पोलिसांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मला खुप कौतुक वाटतं अत्यंत कार्य तत्पर असं त्यांचं हे वागणं आहे. कोणीही गुन्हा दाखल केला की, पाच मिनिटात गुन्हा दाखल करून घेतात. कायद्यामधल्या सगळ्या तरतुदी शोधतात आणि लगेच गुन्ह्याची नोंद करतात आणि त्याची कॉपी समोरच्याच्या हातात देतात हे अत्यंत कौतुकास्पद आहे. ती कॉपी लगेच टीव्हीवर दाखवली जाते. प्रचंड निष्ठावान असा कारभार आहे. मात्र हाच न्याय जो आहे तो आमच्या बाबतीत लावण्यात येत नाही, तो आमच्या बाबतीत सुद्धा दाखवावा. हवं तर आम्हाला कॉपी देऊ नका पण गुन्हा तर दाखल करा अशी उपहासात्मक टीका जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याबद्दल केली आहे. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसऱ्या न्याय हे योग्य नव्हे असाही टोला आव्हाड यांनी लगावला.

मी आजही माझ्या आरोपांवर ठाम आहे. मागचे सर्व सीसीटीव्ही फुटेज काढा कोण येतो कुठे बसतो हे सर्व स्पष्ट होईल. मी माझ्या आरोपांवर ठाम असून जर मी खोटं बोललो असेल, चुकीचा बोललो असेल, तर मी माफी मागायला तयार आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांची मानसिक स्थिती सध्या जरा तशीच आहे..त्यांना छोट्या-मोठ्या चुकां बद्दल आपण माफ केलं पाहिजे ते सध्या खूप तणावाखाली आहेत असं बोलणं त्यांच्या मानसिक अवस्थेचे प्रकटीकरण असून निवडणूक आयोगाचे आणि मुख्यमंत्री महोदयांचे अतूट असे नाते निर्माण झाले आहे. तुम्ही त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तरी ते हेच सांगतील निवडणूक आयोगाला विचारून सांगतो. त्यामुळे त्यांच्या या सध्याच्या मानसिक स्थिती नुसारच ते बोलत असल्याची उपहासात्मक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Updated : 23 Feb 2023 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top