Home > News Update > संविधान दिनी 'जयंती'चा गौरव, पुणे आणि नाशिकमध्ये प्राईमटाईम शो

संविधान दिनी 'जयंती'चा गौरव, पुणे आणि नाशिकमध्ये प्राईमटाईम शो

संविधान दिनी जयंतीचा गौरव, पुणे आणि नाशिकमध्ये प्राईमटाईम शो
X

लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेला पहिला मराठी सिनेमा 'जयंती'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. या यशानंतरच्या तिसऱ्याच आठवड्यात जयंती सिनेमाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. बॉलिवूडमधील दोन बिग बजेट हिंदी सिनेमांची स्पर्धा असतानाही जयंती सिनेमाच्या शोसाठी आता प्राईम टाईम स्लॉट मिळाला आहे.

खास पुणेकरांसाठी जयंती आता तिसऱ्या आठवड्यात अभिरूची सिटी प्राईड, सिंहगड रोड येथे साजरी होणार आहे. २६ नोव्हेंबरपासून २ डिसेंबर पर्यंत रोज सायंकाळी ६.१५ वाजता शो इथे असणार आहे. सिनेमाच्या टीमने झगडून ही स्क्रीन मिळवली आहे. समोर स्पर्धेत हिंदीतील दोन बिग बजेट सिनेमे आहेत. तरी पुणेकरांनी जयंतीला जो भरभरून प्रतिसाद दिला ते पाहून संविधान दिनाचे औचित्य साधून 'जयंती'ला प्राईम टाईम स्लॉट मिळवून देण्यात आला आहे. पुण्यातील प्रत्येक शो हाऊस फुल करण्याची जबाबदारी आता सर्व प्रेक्षकांची आहे असे आवाहन देखील सिनेमाच्या टीमने केले आह

तर नाशिक रोडच्या आयनॉक्स मध्ये जयंती तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहे. दिनांक २७ नोव्हेंबर पासून २ डिसेंबर पर्यंत रोज सायंकाळी ७.०० वाजता. इथे प्राइम टाइमचा स्लॉट मिळाला आहे त्यामुळे नाशिक करणेदेखील जयंतीला या आधी जो प्रतिसाद दिला आहे तसाच उदंड प्रतिसाद आताही द्यावा असे आवाहन सिनेमाच्या टीमने केले आहे.

Updated : 26 Nov 2021 4:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top