Home > News Update > जयंत पाटलांनी लिहले आंबेडकरांना पत्र

जयंत पाटलांनी लिहले आंबेडकरांना पत्र

जयंत पाटलांनी लिहले आंबेडकरांना पत्र
X

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन करा, असे आवाहन काही सामाजिक संस्थांकडून अनुयायांना करण्यात आलं आहे. या सूचनेचं पालन करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातील मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.

#LetterToAmbedkar : मंत्री जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन ! महाविकास आघाडी रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार समता न्याय बंधुता या मुल्यांचं रक्षण करणार

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केले आहे. महाविकास आघाडी रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार, कितीही हल्ले झाले तरी समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं रक्षण करणार असं त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. आंबेडकरी अनुयायांकडून सरकारने घातलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे. त्याच अनुषंगाने आंबेडकरी अनुयायांतर्फे #LetterToAmbedkar ही मोहीम राबवली जात आहे. ज्यात प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न जता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन केले जाणार आहे. स्वतः पत्र लिहत मंत्री जयंत पाटील यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणतात

प्रिय बाबासाहेब,

देशभरातील कोविडचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देशहितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळतोय.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही काम करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं आम्ही रक्षण करू




चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन !!!





Updated : 6 Dec 2020 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top