Home > News Update > रात्री पोलिस स्टेशनला गेलेल्या देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटलांचा सवाल

रात्री पोलिस स्टेशनला गेलेल्या देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटलांचा सवाल

रात्री पोलिस स्टेशनला गेलेल्या देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटलांचा सवाल

रात्री पोलिस स्टेशनला गेलेल्या देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटलांचा सवाल
X

राज्यसरकारला... स्थानिक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती न देता लोकांचे प्राण वाचवणारं रेमडेसिवीरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात? नवीन कायदा आला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

एका साठेबाजाची बाजू घेण्यासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये जातात. या भाजपाच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दरम्यान साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी केल्याबद्दल जयंत पाटील यांनी पोलिसांचे कौतूक देखील केले आहे. पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं. त्यानंतर राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.

त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत, असं म्हटलं होतं. तसंच काही दिवसापूर्वी भाजपचे नेते दमणला जाऊन आले आणि ५० हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन आम्ही महाराष्ट्रात वाटू असं ट्वीट केलं होतं.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated : 2021-04-18T20:05:53+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top