Home > News Update > पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिबांचा नाही - जावेद अख्तर

पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिबांचा नाही - जावेद अख्तर

पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिबांचा नाही - जावेद अख्तर
X

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला राज्यसभेत उत्तर देताना प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केला. मोदींनी शायरीच्या माध्यमातून काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला. तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. आझाद यांच्या टीकेला मोदींनी शायरीच्या माध्यमातून उत्तर दिलं.

गालिबनं अशा (आझाद यांच्यासारख्या) माणसांसाठी म्हटलं होतं, असं म्हणत मोदींनी एक शायरी ऐकवली. 'ता उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा,' असं मोदी म्हणाले.

मात्र यानंतर अनेकांनी पंतप्रधानांची चूक दाखवून दिली. प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनीदेखील यावर भाष्य केलं. 'पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही. तर तो सोशल मीडियावरुन आलेला आहे. खरं तर या शेरमधील दोन ओळी योग्य मीटरमध्येही नाहीत,' असं अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटलं. तर दुसरीकडे मोदींनी केलेली शायरी मिर्झा गालिब यांनी लिहिलेलीच नसल्याच्या अनेक कमेंट सोशल मीडियावर शेअर झाल्या आहेत.

Updated : 27 Jun 2019 4:49 AM GMT
Next Story
Share it
Top