Home > News Update > वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू; ५७ जण जखमी

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू; ५७ जण जखमी

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू; ५७ जण जखमी
X

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथील जम्मू जिल्ह्यात मंगळवारी वैष्णोदेवी(Vaishnodevi) येथे जाणारी बस पुलाखाली कोसळली. रेलिंगला धडकून कोसळल्याने झालेल्या अपघातात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू(Death) झाला आहे. यामध्ये बहुतांश भाविक हे बिहारचे(Bihar) असून, ५७ जण जखमी झाले आहेत. त्यातील जखमींपैकी दोघांची स्थिती गंभीर आहे.




‘अपघातग्रस्त बसमधून जखमी चालक आणि प्रवाशांची सुटका करण्यासाठी १३७ सीआरपीएफ बटालियनच्या जवानांनी बचावकार्य केले,’ अशी माहिती ‘सीआरपीएफ’कडून(CRPF) ट्वीटद्वारे देण्यात आली. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(NItish kumar) यांनी बिहारमधील भाविकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. राज्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले.

ही बस अमृतसर (Amritsar)येथून कटरा येथे जात होती. यावेळी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. ‘झज्जर कोटली पुलावर अपघात घडला. दरम्यान यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जम्मूमध्ये झालेल्या बस अपघातात अनेक यात्रेकरूंचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे.”

अडीच वर्षाच्या मुलीच्या 'मुंडण' कार्यक्रमासाठी पंजाबमधील अमृतसर आणि बिहारमधील लखीसराई जिल्ह्यातील नातेवाईक आणि त्यांचे निकटवर्तीय असे मिळून जवळपास ७० हून अधिक लोक वैष्णोदेवीला नि्घाले होते. मात्र, वाटेतच बस पुलावरुन खाली कोसळल्यानं १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये बसचालक गणेश कुमार याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, गंभीर जखमींना ५० हजार रुपये द्यावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.

Updated : 31 May 2023 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top