Home > News Update > निवारा बालगृहात जामखेड पोलिसांनी साजरा केला रक्षाबंधन सण

निवारा बालगृहात जामखेड पोलिसांनी साजरा केला रक्षाबंधन सण

जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील निवारा बालगृह येथे मुलींनी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

निवारा बालगृहात जामखेड पोलिसांनी साजरा केला रक्षाबंधन सण
X

जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील निवारा बालगृह येथे मुलींनी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की, देशातील सर्व बहिणी सुखी राहाव्या म्हणून खाकीतील त्यांचा भाऊ रात्रंदिवस आपली सेवा बजावत असतात, हे करताना असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधता येत नाही, मात्र आज बहिणीची कमी या निवारा बालगृहातील अनाथ मुलांनी भरून काढली.

संस्थेचे संस्थापक डॉ. अरुण जाधव यांनी ज्या कुणी अनाथ , निराधार माताभगिनी आहेत, त्यांचा भाऊ म्हणून ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने निश्चित काम करत राहू अशी त्यांनी ग्वाही दिली.

मोहा फाटा येथील ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचलित निवारा बालगृहात अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके-विमुक्त, आदिवासी घटकातील 71 मुलां- मुली शिक्षण घेत आहेत. या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. हा प्रकल्प जामखेडच्या वैभवात भर टाकणारा शैक्षणिक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला पोलीस बांधवांचे सहकार्य लाभत असल्याने संस्थेने त्यांचे आभार मानले आहेत.

यावेळी ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक डॉ. अरुण जाधव, संचालक बापू ओहोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 22 Aug 2021 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top