Home > News Update > जालना अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावर पथकावर वाळू माफीयांचा जीवघेणा हल्ला

जालना अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावर पथकावर वाळू माफीयांचा जीवघेणा हल्ला

जालना अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावर पथकावर वाळू माफीयांचा जीवघेणा हल्ला
X

जालना/अजय गाढे

जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वाळू माफियांनी हौदास सुरू केला असून अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या पथकावर हल्ला चढवल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झालय 28.रोजी रात्री अकरा वाजे दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार व त्यांच्या पथकाने मौजे भादली तालुका घनसावंगी येथील गोदावरी नदी पात्रा मधून होत असलेल्या वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी अचानकपणे धाड टाकली असता वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन हायवा व तीन ट्रॅक्टर तसेच वाळूचे अवैध उत्खनन करणारे एक जेसीबी पकडले होते दरम्यान ताब्यात घेतलेली वाहने घेऊन पोलीस स्टेशन घनसावंगी येथे येत असतांना रात्रीच्या वेळी हायवा मालक व त्यांच्या सोबत असलेल्या वाळू माफियांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकावर फिल्मी स्टाईल हल्ला चढवत दगडांनी व लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून सदर हल्ल्यामध्ये पथकाने आणलेल्या मारुती सुझुकी एरटीगा या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.





पथकातील कर्मचारी अक्षय आडेकर यास वाळू माफियांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली यात संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. वाळू माफियांनी पथकावर हल्ला करून ताब्यात घेतलेली वाहने पळवून नेण्यात आली आहेत तर एक हायवा ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन घनसावंगी येथे जमा करण्यात आला आहे. घटनेतील संशयित आरोपींवर पोलीस ठाणे घनसावंगी येथे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





सदर भ्याड हल्ल्यामुळे गौण खनिज अवैध उत्खनन व प्रतिबंधक पथकातील कर्मचारी यांचे मनोधैर्य खच्चीकरन करण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून केला जात आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा चावट्यावर आली आहे याआधी सुद्धा कर्मचारी व अधिकारी यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु कठोर अशी कारवाई होत नसल्याने वाळू माफियांची दहशत दिवसदिवस वाढत असल्याचे जालन्यातील घनसावंगी तालुक्यात दिसत आहे.




Updated : 1 March 2024 10:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top