Home > News Update > भीमसैनीकाने जाब विचारताच या मंत्र्यांना भर सभेत मागावी लागली माफी...

भीमसैनीकाने जाब विचारताच या मंत्र्यांना भर सभेत मागावी लागली माफी...

भीमसैनीकाने जाब विचारताच या मंत्र्यांना भर सभेत मागावी लागली माफी...
X

जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या (bheemjayanti)निमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabarao Patil) यांची उपस्थिती होती. गुलाबराव पाटलांनी आपलं भाषण आटोपल्यानंतर एका भीमसैनिकाने त्यांना रोखत थेट जाब विचारला.

मागच्या महिन्यात जळगाव(Jalgoan) शहरातील रेड क्रॉस सोसायटीसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात उद्भवलेल्या वादाबाबत त्या भीमसैनिकाने गुलाबराव पाटलांना जाब विचारला.

एवढी मोठी घटना घडून देखील तुम्ही त्या ठिकाणी आला नसल्याची आम्हाला खंत असल्याचे भीमसैनिक म्हणाला. भीमसैनिक आक्रमक झाल्याचे पाहून गुलाबराव पाटलांनी माफी मागत दिलगिरी व्यक्त करत आपण त्या ठिकाणी का आलो नाही याबाबत स्पष्टीकरण दिलं. अधिवेशनामुळे आपल्याला येता आलं नाही. त्याबाबत आपण क्षमा मागत असल्याचे गुलाबराव म्हणाले आणि विषयावर पडदा टाकला...

Updated : 14 April 2023 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top