Home > News Update > जय श्रीराम बोल नहीं तो मारुंगा, परप्रांतीय टोळक्याची मराठी तरुणाला जबर मारहाण

जय श्रीराम बोल नहीं तो मारुंगा, परप्रांतीय टोळक्याची मराठी तरुणाला जबर मारहाण

जय श्रीराम बोल नहीं तो मारुंगा, परप्रांतीय टोळक्याची मराठी तरुणाला जबर मारहाण
X

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतून मॉब लिंचिंगच्या आणि धार्मिक दहशत माजवण्याच्या बातम्या येत असतात. मात्र याचे लोण आला मुंबईतही पोहचल्याचे पहायला मिळत आहे.


जमावाने एखाद्या व्यक्तीला गाठून मॉब लिंचिंग आणि धार्मिक दहशत माजवण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र याचे लोण आता थेट मुंबईतही पोहचले आहे. यामध्ये परप्रांतीय तरुणांनी जय श्रीरामच्या घोषणा द्या, नाहीतर तुला मारु असं म्हणत जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.




मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ किसन अंगुरे हे 25 सप्टेंबर रोजी कामावरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी गोकुळनगर कांदिवली पूर्व येथे एका परप्रांतीय टोळक्याने सिद्धार्थ यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर त्या टोळक्यातील एकाने ‘जय श्रीराम बोल, नहीं तो मारुंगा, अशी धमकी दिली. त्यामुळे अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे सिद्धार्थ गडबडले. त्यांनी तसं बोलण्यास नकार दिला. त्यावेळी तु कटवा है क्या, असं म्हणत शिवीगाळ आणि मारहाण केली. मात्र सिद्धार्थ यांचे भाऊ आणि भाचा यांनी या टोळक्याच्या हातून सिद्धार्थ यांना वाचवले. त्यानंतर सिद्धार्थ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली पश्चिम येथे दाखल करण्यात आले.


या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 341, 504, 323, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी मुंबईतील बांद्रा या ठिकाणी जय श्रीराम घोषणा देण्याची जबरदस्ती करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. मात्र मुंबईसारख्या देशाचे लक्ष असलेल्या शहरात असे प्रकार घडणे चिंताजनक आहे. यावर पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे आहे.

Updated : 28 Sep 2023 8:05 AM GMT
Next Story
Share it
Top