Home > News Update > आयकर विभागाच्या धाडीत १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त

आयकर विभागाच्या धाडीत १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त

केंद्र आणि राज्य संघर्षात केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत असतानाच

आयकर विभागाच्या धाडीत १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त
X



गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाने मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमध्ये टाकलेल्या सुमारे ७० धाडीत १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आल्याची माहिती आयकर विभागाने आज प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून दिली आहे.


गेल्या काही दिवसात आयकर विभागाच्या वतीने पवार कुटुंबियांच्या संबंधित कंपन्या आणि निवासस्थानावर धाडी टाकल्या होत्या.

याडी भरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते.


राज्यात आणि परराज्यात पार पडलेल्या धाडसत्रा मध्ये आयकर विभागाने जाहीर केल्याप्रमाणे२.१३ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाने ७ ऑक्टोबरपासून हे धाडसत्र अवलंबिले होते. मुंबई, पुणे, बारामतीत विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशीसंबंधित कार्यालये, घरावर धाडी टाकण्यात आल्या होत्या.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत या धाडींवरुम केंद्र सरकारवर टीका देखील केली होती.


मुंबईतील दोन बांधकाम व्यावसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्ती कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या कारवाई मिळालेल्या पुराव्यांमधून प्रथमदर्शनी अनेक बेहिशोबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, दोन समुहांचे सुमारे १८४ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावेही सापडले आहेत, असेही आयकर विभागने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


या कारवाईत व्यावसायिक गटांनी विविध कंपन्यांचे जाळे निर्माण करून संशयास्पद व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. जे प्रथमदर्शनी संशयास्पद आहेत. निधीच्या प्रवाहाचे प्राथमिक तपासात बोगस शेअर प्रीमिअम, संशयास्पद मार्गाने बेहिशोबी निधी जमवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका प्रभावाशाली कुटुंबाच्या सहभागातून हा निधीचा ओघ आल्याचे आढळून आले आहे.


संशयास्पद पद्धतीने जमवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्या खरेदीसाठी केला गेला आहे. यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय इमारत, आलिशान फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेत जमिनी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे. या मालमत्तांचे मूल्य सुमारे १७० कोटी रुपये आहे, असे आयकर विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.‌

आयकर विभागाने आता ही माहिती प्रसिद्ध केल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असून यापुढील काळात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 15 Oct 2021 2:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top