Home > News Update > इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष वाढणार, इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिले संकेत

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष वाढणार, इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिले संकेत

का होतोय इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष, संघर्षाची कारण काय आहेत. घरावर बॉम्ब टाकरणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले आहेत का? या सर्व संघर्षांमध्ये इस्रायलची भूमिका काय?

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष वाढणार, इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिले संकेत
X

यरूशलेम: इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्षाचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असालच. आता हा संघर्ष (Israel-Palestine conflict) वाढण्याची चिन्ह आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलतान संघर्ष वाढेलं. अशी विधान केली आहेत. त्यांनी या सर्व संघर्षाला हमास (Hamas) या संघटनेला जबाबदार ठरवलं आहे.

त्यांच्या मते हमासने इस्रायल वर रॉकेट टाकून संघर्षाला तोंड फोडलं आहे. जो पर्यंत गरज आहे. तोपर्यंत गाजा वर हल्ले सुरु राहतील. या हल्ल्यात नागरिकांना हानी पोहोचू नये. याची काळजी घेण्याचे प्रयत्न इस्रायल करत आहे. वृत्त एजंसी रायटर्स च्या मते, नेतन्याहू यांनी एका माध्यमांशी बोलताना या संघर्षाला हमास या संघटनेला जबाबदार धरले आहे. हमास जानबुजून सर्वसामान्य लोकांच्या मध्ये राहून त्यांना नुकसान पोहोचवण्याचं काम करत आहे. आम्ही दहशतवाद्यांना लक्ष्य करु इच्छितो. सर्वसामान्य नागरिकांना नाही.

इस्रायल आणि हमास यांचा संघर्ष सातव्य़ा दिवशीही सुरु आहे. इस्रायल ने आज हमासच्या प्रमुखांच्या घरावर बॉम्ब हल्ले केले. तर हमास ने तेल अवीव येथे रॉकेट टाकले. सध्या हा संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनच्या 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

वादाचे कारण काय?

खरं तर या वादाचे कारण तात्कालीक वाटत असलं तरी याची बीज इतिहासात आहेत. इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या देशात सहभादी करुन घेत असल्याची घोषणा केली. इस्रायलच्या या घोषणेना काही देशांचा विरोध आहे. इस्रायल ने जेरुसलेम ताब्यात घेतल्यानंतर पॅलेस्टाइन आणि इस्रायलचा संघर्ष वाढला.

पॅलेस्टाईन मधील लोक इस्रायल च्या या घोषणेचा विरोध करतात. या देशाचील काही लोकांना नवीन देश निर्माण करण्याची इच्छा असून आणि या नवीन देशाची राजधानी ईस्ट जेरुसलेम असेल. असा दावा ते करत असतात.

आत्ता संघर्ष निर्माण होण्याचे कारण काय?

रमजान ईदच्या निमित्ताने शुक्रवारी काही लोक एकत्र जमले होते. 7 मेला शेवटचा शुक्रवार असल्याने गर्दी अधिक प्रमाणात होती. या दरम्यान हिंसाचाराला सुरुवात झाली. हा हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर पोलिसांनी स्टेन ग्रेनेडचा वापर केल्याचं समजतंय. तेव्हापासून सुरु झालेला हा संधर्ष आजही सुरुच आहे.

Updated : 16 May 2021 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top