ठाण्यातील कळवा, मुंब्रा, कल्याण आणि डोंबिवली भागातील रेल्वे स्टेशनच्या परिसरातील लोकांनी घरे खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडही आक्रमक झाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोणीही गरीबांचा निवारा हिरावून घेत असेल तर मी छातीचा कोट करून उभा राहिल असा इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईनच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरीबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने यावर वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर 10 झोपडपट्टीवासीयांनी ठरवलं तर पुर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो. लढाऊ असतो, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला इशारा दिला. तर क्या गरीबोंकि जान, जान नहीं होती सेठ, असे म्हणत केंद्र सरकारला सवाल केला आहे.
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर 10 झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो. तर लढाऊ असतो.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 22, 2022
क्या गरिबोकि जान, जान नहीं होती सेठ. pic.twitter.com/5fsjkWiLat