Home > News Update > इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा तालिबानवर हल्ला?

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा तालिबानवर हल्ला?

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा तालिबानवर हल्ला?
X

प्रातिनिधिक छायाचित्र

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं हंगामी सरकार स्थापन केले.मात्र अजूनही अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवाया सुरुच आहेत. आता काही दहशतवादी संघटनांनी तिथे डोकं वर काढल्याचे वृत्त समोर येत आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करत तिथे सिरिअल बॉम्बस्फोट घडवून आणले आहे, या स्फोटाची जबाबदारी स्वीकारत इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आमक न्यूज एजन्सीवर याबाबतचं वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामुळे तालिबाननं जे पेरलं ते उगवत असल्याचं बोललं जातं आहे. इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यात तालिबानी दहशतवाद्यांसह आठ जण ठार झाल्याचे सांगण्यात आलं आहे.

३० ऑगस्टला अफगाणिस्तानातून अमेरिकन सैनिक मायदेशी परतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर तिथे हंगामी सरकार देखील स्थापन केलं. मात्र असं असलं तरी तालिबानसमोर आर्थिक आणि सुरक्षेचं मोठं आव्हान आहे. त्यातच इस्लामिक स्टेटच्या वाढत्या दहशतवादी कारवाया पाहता चिंता वाढली आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत, दोन्ही संघटना इस्लाम विचारधारेशी प्रेरित आहेत. मात्र तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यावर लक्ष केंद्रीत केलं. तर इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानसह इतर ठिकाणी जागतिक जिहादचं आवाहन करते.

त्यातच आता इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानमध्ये स्फोट घडवून आणल्याने हा वाद आणखी चिघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Updated : 21 Sep 2021 12:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top