Home > News Update > Lockdown की कडक निर्बंध? राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती

Lockdown की कडक निर्बंध? राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती

Lockdown की कडक निर्बंध? राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण आता लॉकडाऊन लागले का अशी भीती सर्वसामान्यांना आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील सध्याची कोरोना स्थिती, ऑक्सिजनची उपलब्धता आणि लॉकडाऊन याबद्दल माहिती दिली.

राज्यात सध्या लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. पण राज्यात निर्बंध आणखी कडक केले जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना बाधीत रुग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजनची गरज असते. या ऑक्सिजनची मागणी वाढली की सरकार निर्बंधांबाबत फेरविचार करते. 700 मेट्रिक टनांपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज पडायला लागली तर लॉकडाऊन लावावे लागेल असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. पण राज्यात कठोर निर्बंध लावण्यासाठी काम सुरू झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर हॉस्पिटलमध्ये जास्त प्रमाणात लागणारे बेड, ICU आणि ऑक्सिजन याबाबतहॉस्पिटल्सना सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान Omicron आणि Delta ची लागण झालेल्या पेशंटची ओळख पटणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पेशंटची संख्या वाढू नये आणि संसर्ग वाढू नये याला सरकारचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पेशंट वाढत असल्याने इथे काही निर्बंधांबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात, असे टोपे यांनी सांगितले. पण सध्यातरी लॉकडाऊनचा विचार नसल्याचे टोपे यांनी सांगितले. त्याचबरोबर थिएटर्स, हॉटेल यावर सध्या निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Updated : 1 Jan 2022 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top