Home > News Update > Irshalgad Landslide ; इर्शाळवाडीचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत - उद्धव ठाकरे

Irshalgad Landslide ; इर्शाळवाडीचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत - उद्धव ठाकरे

Irshalgad Landslide ; इर्शाळवाडीचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत - उद्धव ठाकरे
X

खालापूर -रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या दुर्घटनेला तीन दिवस पूर्ण झाले. शिवसेना (उबाठा) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज इर्शाळवाडीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला गावातील लोकांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तुमच्या पाठिशी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची भेट घेतली आणि जोपर्यंत तुमचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असे सांगितले. यात कोणत्याही प्रकाराचे राजकारण येऊ देणार नाही, असे देखील ठाकरे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. इर्शाळवाडीतील ४६ घरांपैकी १७ ते १८ घरांवर २० जुलै रोजी दरड कोसळली होती. तेव्हा वाडीत २३१ नागरिक होते. यापैकी २४ जणांचा मृतदेह सापडला आहे. अजूनही १०५ जण बेपत्ता आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी वाडीला भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी दुर्घटनेतून बचावलेल्याचे सांत्वन केले. गावाचे पुनर्वसन होण्यासाठी हवी ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. यासाठी गरज लागली तर मी स्वत: सरकारकडे जायला तयार आहे. यासाठी मला कोणताही कमीपणा येणार नाही. मी सरकारकडे जनेतेच्या दृष्टीकोनातून पाहतो असे ठाकरे म्हणाले. याच बरोबर राज्यात अशी परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या वाडी, वस्तीचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. तीन ते चार वस्त्या मिळून एखादे गाव वसवले पाहिजे. या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली. कोणतेही सरकार आले तरी या योजनेला स्थगिती देऊ नये असे ही ते म्हणाले. जोपर्यंत वाडीतील सर्वांचे पुनर्वसन होत नाही. तुमचे आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीला आहेत असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

Updated : 22 July 2023 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top