मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जालना संभाजीनगरची इंटरनेट सेवा खंडीत
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Feb 2024 12:41 PM IST
X
X
Beed : मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. बीड, जालना आणि संभाजीनगर येथील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. काल रात्री (२५ फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असणाऱ्या चिंतापूर गावामध्ये मराठा आंदोलकांकडून बस जाळण्यात आली. मराठा आंदोलनाचे पडसाद इतरत्र उमटू नयेत याची दक्षता म्हणून संवेदनशील असलेल्या जालना,बीड, संभाजीनगर या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
राज्याच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडून इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश निघाल्याची प्राथमिक माहिती आहे. इंटरनेट बंद केल्यामुळे प्रशासकीय, बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.
Updated : 26 Feb 2024 12:41 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire