आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
X
नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री दिल्लीतील त्यांच्या राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय कला आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक मोठा अध्याय संपला आहे.
विशेष बाब म्हणजे, वयाच्या शंभराव्या वर्षीदेखील ते कार्यरत होते, ही बाब त्यांच्या अफाट सर्जनशीलतेची आणि ऊर्जेची साक्ष देणारी आहे. देश-विदेशातील अनेक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी शिल्पे त्यांच्या कलेचा ठसा उमटवणारी आहेत. राम सुतार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत भारतीय इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचे भव्य शिल्परूप साकारत देशाच्या सांस्कृतिक वारशात मोलाची भर घातली. त्यांच्या कलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळाली होती.
त्यांच्या निधनाबद्दल कला, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत असून, राम सुतार यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.






