Home > News Update > International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योग दिवसाची २०२३ थीम काय? जाणून घ्या..

International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योग दिवसाची २०२३ थीम काय? जाणून घ्या..

International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योग दिवसाची २०२३ थीम काय? जाणून घ्या..
X

International Yoga Day 2023: आज आतरंराष्ट्रीय योगा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना आपल्या प्रकृतीसाठी महत्वाचा दिवस मानला जातो. फक्त योग दिनानिमित्त नाही तर दररोज प्रत्येकाने योगा करावा. त्यामुळे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगासने करणे गरजेचे आहे. त्याचं महत्व सांगणारा आजचा योग दिवस आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम

यंदा योग कसा करावा? कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी "मानवता" ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग हे ब्रीद वाक्य असल्याचे स्पष्ट केले.





कशी झाली आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरवात?

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

योग दिवस २१ जूनच का?

२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. त्यामुळे हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Updated : 21 Jun 2023 2:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top