Home > News Update > आजपासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा, काय आहेत अटी?

आजपासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा, काय आहेत अटी?

आजपासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा, काय आहेत अटी?
X

गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेली एसटी बससेवी अखेर आजपासून सुरू होत आहे. रेड झोन आणि कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये काही अटीशर्तींची पूर्तता करुन जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सरकारने रेड झोन आणि कंटेंनमेंट झोन वगळता फक्त जिल्हा-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बससेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर एसटी बस सेवा सुरु होत आहे.

एसटी बससेवा सुरू करण्यासाठी नियम आणि अटी

• जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंतच बससेवा सुरु राहणार

• प्रवासासाठी सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण आवश्यक

• सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी

• जेष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी नाही.(अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )

• प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे बंधनकारक

• प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक

एसटीचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी प्रवाशांनी सहकार्य करण्याचं आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे.

Updated : 22 May 2020 1:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top