Home > News Update > अनधिकृतपणे सुरू असलेले कांदा मार्केट बंद करून चौकशी करा ; हमाल मापाड्यांची मागणी...

अनधिकृतपणे सुरू असलेले कांदा मार्केट बंद करून चौकशी करा ; हमाल मापाड्यांची मागणी...

मोराने येथील अनधिकृतपणे सुरू असलेले कांदा मार्केट बंद करून चौकशी करण्याची मागणी हमाल मापाड्यांनी मागणी केली आहे.

अनधिकृतपणे सुरू असलेले कांदा मार्केट बंद करून चौकशी करा ; हमाल मापाड्यांची मागणी...
X

धुळे : धुळे तालुक्यातील मोराने या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपासून काही व्यापारांकडून कांदा मार्केट अनधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसून या कांदा मार्केटमध्ये अव्वाच्या सव्वा दर हे मनमानी पद्धतीने आकारले जात आहेत. आणि त्यामुळेच तालुक्यातील इतर कांदा मार्केटमधील हमाल मापाडी काम करणाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे म्हणत या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.

यासंदर्भात या हमाल मापाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी देखील हमाल मापाडी यांच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन हमाल मापाडी कामगारतर्फे देण्यात आली आहे.

दरम्यान या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर हमाल मापाडी कामगार संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हमाल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी दिला आहे.

Updated : 11 Aug 2021 1:49 PM GMT
Next Story
Share it
Top