News Update
Home > News Update > महागाई आणि दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर

महागाई आणि दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर

महागाई आणि दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर
X

केंद्रातील मोदी सरकारने दुजाभाव करीत सामान्य जनतेचा छळ चालवला आहे, हे सरकार शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे, एवढेच नाही तर सरकारविरोधात बोलणाऱ्यांनाही त्रास दिला जात असून महागाई आणि दडपशाही या मोदी नीतीला आम्ही विरोध करत राहणार असा इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. महागाईविरोधात सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शोमती ठाकूर यांनी ही टीका केली आहे.

देशभरात पेट्रोल-डिझेलसह महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावल्याने विरोधक आक्रमक झाले आहे. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे, देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. "आमदनी अठन्नी खर्चा रुपइया" असे चित्र देशातील प्रत्येक घरात पाहायला मिळते असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. एकीकडे महागाई वाढत असताना याविरोधात आवाज उठविणाऱ्यांवर दडपशाही केली जात आहे, ही मोदी नीती आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Updated : 5 Aug 2022 1:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top