Home > News Update > महागाईचा मुद्दा कॉंग्रेसला संजीवनी देणार का?

महागाईचा मुद्दा कॉंग्रेसला संजीवनी देणार का?

महागाईचा मुद्दा कॉंग्रेसला संजीवनी देणार का?
X

महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसविरोधात टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसने आता महागाईचा मुद्दा मोठा करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसने 5 ऑगस्टला महागाईविरोधात केलेल्या आंदोलनावर सायंकाळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना प्रतिक्रिया द्यावी लागली होती. महागाईच्या मुद्दाला अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना धर्मावर घेऊन जावं लागलं होतं.

5 ऑगस्टला झालेल्या आंदोलनात सर्वसामान्य जनता कॉंग्रेसची साथ देताना पाहायला मिळाली. त्यामुळं कॉंग्रेसने आता महागाई विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानात मोठी रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसच्या महागाई विरोधातील या आंदोलनाअंतर्गत काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात महिनाभर हल्लाबोल आंदोलन करणार आहे.






17 ते 23 ऑगस्ट या काळात सर्व विधानसभा मतदारसंघात महागाई विरोधात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचा शेवट 28 ऑगस्टला दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणार आहे.

काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी या संदर्भात माहिती दिली. कॉंग्रेस सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडई, किरकोळ बाजार आणि इतर ठिकाणी महागाई विरोधात सभा आयोजित केल्या जातील. या सभांमध्ये जनतेशी संवाद साधण्याचं काम कॉंग्रेस करणार आहे. आणि या आंदोलनाचा शेवट 28 ऑगस्ट ला रामलीला मैदानावर होईल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते या सभेला संबोधित करतील.

कॉंग्रेसच्या आंदोलनावर काय म्हटलं होतं मोदी यांनी...

वाढत्या महागाईविरोधात काळे कपडे घालून काँग्रेस नेत्यांनी 5 ऑगस्टला आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळी जादू असं म्हटलं होतं. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्या आरोपांना आज उत्तर दिले.




5 ऑगस्ट रोजी वाढत्या महागाईमुळे काळे कपडे घालून काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यावर टीका करताना अमित शहा यांनी अयोध्या येथे राम मंदिर शिलान्यासाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर निषेध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केल्याचा आरोप केला होता. तर काँग्रेस निराशेत असल्याने काळी जादू करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर दिले.

काय म्हटलंय राहुल गांधी यांनी?

पंतप्रधानांना महागाई दिसत नाही? बेरोजगारी दिसत नाही का? आपले काळे कारनामे झाकण्यासाठीच काळ्या जादूसारख्या अंधश्रध्देच्या गोष्टी सांगून मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खालावत आहेत. तसंच देशाला भटकवणं बंद करा. पंतप्रधान जी जनतेच्या प्रश्नावर उत्तर तर द्यावंच लागेल, असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले की, निराशा आणि हताश झाल्यानेच काही लोक सतत खोटे आरोप करण्यात गुंतले आहेत. मात्र, या लोकांवरचा जनतेचा विश्वास उठला आहे. त्यामुळेच ते काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान कॉंग्रेसला आम्ही फार महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्या मोदी आणि शहा यांना कॉंग्रेसच्या महागाई आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. या आंदोलनावर टीका करताना अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी धर्माकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. तर मोदी यांनी काला जादू म्हटलं होतं. यावरून कॉंग्रेसच 5 ऑगस्टचं आंदोलन यशस्वी झाल्याचं दिसून येतं. मात्र, कॉंग्रेसचं हे महागाई आंदोलन कॉंग्रेसला संजीवनी देणार का? असा प्रश्न निर्माण होतो.

Updated : 11 Aug 2022 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top