Home > News Update > भारताचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, मालिकेतही आघाडी

भारताचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, मालिकेतही आघाडी

भारताचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, मालिकेतही आघाडी
X

जयपूर : भारत आणि न्यूझीलंड संघातील सामन्यांना सुरुवात झाली असून पहिला सामना जयपूरच्या मैदानात नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. एकावेळी सामना भारताच्या पारड्यात झुकल्याचं दिसून येत होतं. पण अखेरच्या काही ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत भारताच्या हातातून सामना खेचण्याचा प्रयत्न केला. भारताला अखेरच्या 3 चेंडूत 3 धावांची गरज होती. त्यावेळी पंतने चौकार खेचत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडने 164 धावा केल्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार आणि रोहितने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. रोहितने 36 चेंडूक 48 धावा केल्या. तर सूर्यकुमारने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावा केल्या. मात्र, सूर्या बाद होताच श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर दोघेही बाद झाले. ज्यानंतर पंतने अखेरच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना चौकार लगावत विजय भारताच्या नावे केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

Updated : 18 Nov 2021 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top