Home > News Update > भारतीय निवडणूकांमध्ये इस्राईली हॅकर्स कंपनीचा हस्तक्षेप? काँग्रेसचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा

भारतीय निवडणूकांमध्ये इस्राईली हॅकर्स कंपनीचा हस्तक्षेप? काँग्रेसचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा

जगभरातील विविध माध्यमसंस्थांमधील 30 पत्रकारांनी इस्राईलमधील हॅकर्स (Israel Hackers) कंपनीचा पर्दाफाश केला आहे. तर या कंपनीने 30 देशांमधील निवडणूकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यावर काँग्रेसने आक्रमक होत चौकशीची मागणी केली आहे.

भारतीय निवडणूकांमध्ये इस्राईली हॅकर्स कंपनीचा हस्तक्षेप? काँग्रेसचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा
X

जगभरातील विविध माध्यमसंस्थांमधील 30 पत्रकारांनी इस्राईलमधील हॅकर्स (Israel Hackers) कंपनीचा पर्दाफाश केला आहे. तर या कंपनीने 30 देशांमधील निवडणूकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यावर काँग्रेसने आक्रमक होत चौकशीची मागणी केली आहे.

देशात अदानी प्रकरण (Adani) गाजत असतानाच जगभरातील 30 विविध माध्यमसंस्थांमधील पत्रकारांनी एकत्र येत इस्राईलमधील हॅकर्स कंपनीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये या कंपनीने 30 देशांमधील निवडणूकींमध्ये हस्तक्षेप केल्याचा धक्कादायक अहवाल या कंपनीने प्रसिध्द केला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्र सोडले आहे. (Congress Criticize to PM Modi)

हा अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) आणि सुप्रिया श्रिनाते (Supriya Shrinate) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय निवडणूकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी भाजपने परदेशी हॅकर्सचे नेटवर्क वापरले का?, असा सवाल पवन खेरा यांनी केला. तसेच पेगासिस (Pegasisi) आणि केंब्रीज अॅनालिटिका (Facebook–Cambridge Analytica data scandal) या कंपन्यांचा उल्लेख करीत काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याबरोबरच इस्रायली हॅकर्स कंपनी'जॉर्ज' या कंपनीची तुलना भाजपच्या आयटी सेलशी (BJP IT cell) करत काँग्रेसने भाजपवर टीकास्र सोडले.

काय आहे प्रकरण?

जगभरातील विविध माध्यमसंस्थांमधील 30 शोध पत्रकारांनी एकत्र येत एक अहवाल प्रसिध्द केला. यामध्ये प्रामुख्याने फोरबिडन (Forbidden), ब्रिटनमधील 'द गार्डियन' (The Guardian) फ्रान्समधील 'द ले माँडे'(The le Monde) यांच्या शोध पत्रकारांचा समावेश होता. यांनी इस्राईली हॅकर्स कंपनीचा पर्दाफाश केला आहे. या कंपनीचा उल्लेख या शोध पत्रकारांनी प्रसिध्द केलेल्या अहवालामध्ये टीम जॉर्ज (Team George) असा करण्यात आला आहे. या पत्रकारांनी कंपनीच्या कामकाजाविषयी जाणून घेण्यासाठी बनावट ग्राहक पाठवले. यानंतर उघडकीस आलेल्या माहितीनुसार ही हॅकर्स कंपनी 'ताल हनान' (Tal Hanan) नावाच्या व्यक्तीकडून चालवली जाते. मात्र त्याने सध्या जॉर्ज हे नाव परिधान केले आहे. तो इस्राईलच्या स्पेशल फोर्समध्ये ऑपरेटिव्ह (Special Force operative) म्हणून काम करत होता. त्याने गेल्या वीस वर्षांपासून जगभरातील विविध देशांच्या निवडणूकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा संशय होता. त्यामुळेच जगभरातील 30 पत्रकारांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अहवाल प्रसिध्द केला.

काय आहे रिपोर्टमध्ये?

टीम जॉर्ज ही कंपनी फेसबुक (Facebook), ट्वीटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), अॅमेझॉन (Amazone), एअरबीएनबी (AirBNB), जीमेल (Gmail) यावर फेक प्रोफाईल काढून फेक प्रोफाईलच्या माध्यमातून फेक न्यूजचे (fake News) युनिट चालवते. ही कंपनी Advanced Impact Media Solution (AIMS) नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी 30 हजार पेक्षा जास्त सोशल मीडिया अकाऊंट चालवते, असा रिपोर्ट द गार्डियनने प्रसिध्द केला आहे. (Report of the guardian on israel hackers)

द गार्डियनच्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अज्ञात गुप्तचर संस्था, राजकीय पक्ष (political Party) आणि कॉर्पोरेट ग्राहक (corporate client) यांना सॉफ्टवेअर विकल्याचे ताल हनानने सांगितले. यामध्ये ब्रिटनच्या Information commissioner's officer वर लक्ष ठेवण्यासाठी अज्ञात व्यक्तीला सॉफ्टवेअर विकल्याचेही ताल हनानने सांगितले.

पुढे 18 ऑक्टोबर 2020 मध्ये ब्रिटनमध्ये ICO ने निर्णय दिला की, राजकीयदृष्ट्या VIP लेनमध्ये प्रवेश देण्यासाठी कोणत्या कंपन्यांना सरकारने मल्टिमिलियन पाऊंडचे कंत्राट दिले होते ते उघड करावे, असे म्हटले. तर यामागे राजकीय प्रेरणा असल्याचे स्पष्ट होत आहे, असं ट्वीटरवर दोन दिवसानंतर ग्राहकाने म्हटले.

हे सरकारला बदनाम करण्यासाठी बॉट्सद्वारे तयार केलेली टिपण्णी होती. त्यामुळे ICO अधिकारी सरकारला बदनाम करण्यासाठी हे सर्व करत असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.

टीम जॉर्जने प्रेझेंटेशनदरम्यान दाखवलेल्या अकाऊंटपैकी AIMS चे दोन हजार बॉट्स नेटवर्क ओळखणे शक्य झाले. त्याबरोबरच या शोधपत्रकारांनी 20 देशांमध्ये सुरु असलेल्या हॅकिंगचा पर्दाफाश केला. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड, ग्रीस, पनामा, सेनेगल, मॅक्सिको, मोरोक्को, भारत, संयुक्त अरब अमिरात, झिम्बाव्बे, बेलारुस आणि इक्युडोर या देशांचा समावेश असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. (List of country where use AIMS software of Team George)

कॅनडामधील #MeToo वाद असो वा कॅलिफोर्नियातील अणूशक्तीच्या वादात बॉट्स एक्टिव्हिटी असल्याचे विश्लेषणात दिसून आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

याप्रकारे विविध देशात AIMS द्वारे फेक न्यूज पसरवण्यात आल्याचे विश्लेषण या अहवालात केले आहे. त्यातच या 20 देशांमध्ये भारताचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भारतीय निवडणूकींमध्ये भाजपने या हॅकर्सची मदत घेतली आहे का? हे स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेरा आणि प्रवक्ता सुप्रिया श्रिनाते यांनी केली.

Updated : 17 Feb 2023 3:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top