Home > News Update > आनंदी देशांच्या यादीत भारत दुःखी?

आनंदी देशांच्या यादीत भारत दुःखी?

संयुक्त राष्ट्रांकडून जगभरातील देशांचे सर्व्हेक्षण करून आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. या यादीत 150 देशांचा समावेश आहे. मात्र 150 देशांमध्ये भारत तळाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आनंदी देशांच्या यादीत भारत दुःखी आहे का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

आनंदी देशांच्या यादीत भारत दुःखी?
X

संयुक्त राष्ट्रांकडून जगभरातील देशांचे सर्व्हेक्षण करून आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. या यादीत 150 देशांचा समावेश आहे. मात्र 150 देशांमध्ये भारत तळाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आनंदी देशांच्या यादीत भारत दुःखी आहे का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

दरवर्षी जगभरातील 150 देशांमधून नागरिकांचे चांगले राहणीमान, जीडीपी, सरासरी आयुर्मान आणि वैयक्तिक पातळीवर असलेले समाधान याची माहिती वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात येते. त्यात 2022 चा आनंदी देशांचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. त्यामध्ये फिनलॅंडने प्रथम क्रमांक राखला आहे. तर भारत 146 देशांच्या यादीत तळाला आहे.

सध्या जगाचे टेन्शन वाढवणाऱ्या रशिया आणि युक्रेन या देशाचा आनंदी देशांच्या यादीत अनुक्रमे 80 आणि 98 वा क्रमांक लागतो. मात्र 146 देशांपैकी भारत 136 व्या क्रमांकावर आहे. तर सलग पाचव्या वर्षी फिनलॅंडने सर्वात आनंदी राहणारा देशाच्या यादीत प्रथम क्रमांक कायम राखला आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या दहा देशांच्या यादीतून ऑस्ट्रिया बाहेर जात फिनलॅंड पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्वीडन, नॉर्वे, इस्राईल आणि न्यूझिलंड या देशांचा क्रम लागतो.

संयुक्त राष्ट्रांनी प्रसिध्द केलेल्या अहवालात अफगाणिस्तानचा सर्वात शेवटचा क्रमांक लागतो. तर लेबनॉन आणि झिम्बाव्बे या देशांचा क्रमांक 145 आणि 144 वा आहे. तर या यादीत भारत शेवटून 11 व्या स्थानी म्हणजेच 136 व्या क्रमांकावर आहे.

Updated : 19 March 2022 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top