Home > News Update > चिंता वाढली, देशात Omicron बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात

चिंता वाढली, देशात Omicron बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात

चिंता वाढली, देशात Omicron बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात
X

देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २७ हजार ५५३ रुग्ण आढळले आहेत. तर २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण त्याचबरोबर ९ हजार २४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या वाढलेल्या संख्येमुळे देशात कोरोनाच्या एक्टीव्ह रुग्णांची संख्या १ लाख २२ हजार ८०१ वर पोहोचली आहे.

तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील Omicron बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५२५ झाली आहे. देशातील २३ राज्यांमध्ये Omicron चा फैलाव झाला आहे. यापैकी Omicron सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, राज्यात Omicron चे सध्या ४६० रुग्ण आहेत. तर दुसरा क्रमांक दिल्लीचा आहे दिल्लीत सध्या Omicronचे ३५१ रुग्ण आढळले आहेत. देशातील बहुतांश शहरी भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहेत.

मुंबईत शनिवारी ६ हजार १८० रुग्ण आढळले आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १३ टक्क्यांच्या जवळपास पोहोचला आहे. दरम्यान १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यासाठीची नोंदणी १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. दरम्यान देशातील लसीकरणात बरीच प्रगती झाली असून आतापर्यंत १४५ कोटींच्या वर डोस दिले गेल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

Updated : 2 Jan 2022 5:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top