Home > News Update > भारत आर्थिक मंदीच्या छायेत, राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

भारत आर्थिक मंदीच्या छायेत, राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

भारत आर्थिक मंदीच्या छायेत, राहुल गांधींचा मोदींवर हल्ला
X

बिहार विधनासभा निडणुकीतला विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेत्यांना साजरा करुन १२ तास उलटत नाहीत तोच देश तांत्रिकदृष्ट्या आर्थिक मंदीच्या छायेत असल्याचे वृत्त इकॉनॉमिक्स टाईम्सने दिले आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी ८.६ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याआधी एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी २३ टक्क्यांनी घटला होता. त्यामुळे सलग दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी घसरलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यत आले आहे. त्यामुळे २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात आर्थिक मंदी निश्चित असल्य़ाचे या वृत्तात म्हटले आहे. अर्थशास्त्रानुसार जेव्हा सलग दोन तिमाहीमध्ये जीडीपीचा दर नकारात्मक आला तर त्याला मंदी म्हटलं जाते.

कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीडीपी २३.९ टक्के झाला होता. दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपीचे सरकारी आकडे अजून जाहीर जालेले नाहीत. पण रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या आकडेवारीच्या आधारे अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जीडीपी ८.६ टक्के राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे बुधवारी मासिक बुलेटिन प्रकाशित करण्यात आले, त्यामध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान या वृत्ताचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरुन मोदींवर टीका केली आहे. देश पहिल्यांदाच आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे आणि याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


Updated : 12 Nov 2020 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top