Home > News Update > कोरोनाः भारतात मृत्यूदर वाढणार संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा

कोरोनाः भारतात मृत्यूदर वाढणार संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा

कोरोनाः भारतात मृत्यूदर वाढणार संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा
X

देशात कोरोना रूग्णांचे प्रमाण दिवेसेंदिवस वाढत असले तरी मृत्युचं प्रमाणे गेल्या लाटेच्या तुलनेत कमी आहे. मात्र, येत्या काही दिवसात भारतात कोरोना रूग्णांच्या मृ्त्यूदरात वाढ होण्याची भीती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका अहवालात व्यक्त केली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र संघटनेच्यावतीने सादर केलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटने भारतात २०२१ मध्ये एप्रिल ते जून दरम्यान आलेल्या लाटेत २,४०,००० लोकांचा जीव गेला होता आणि मोठा आर्थिक फटका देशाला बसला होता. नजीकच्या काळात अशीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघटनेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात दिला आहे.

ओमिक्रॉन संसर्गाच्या नवीन व्हेरिअंटमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. असं अहवालात म्हटलं आहे. देशात २४ तासांत कोरोना संसर्गाचे २,६४,२०२ नवीन रुग्ण आढळले आहेत. काल कोरोनाचे २,४७,४१७ रुग्ण आढळले होते. देशाचा पॉजिटिविटी रेट १४.७८ % आणि साप्ताहिक पॉजिटिविटी रेट ११.८३% वर गेला आहे. तर देशातील संख्या १२,७२,०७३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळ या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत.

Updated : 14 Jan 2022 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top