Home > News Update > गांधीनगर येथे राजे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उद्यानाचे लोकार्पण

गांधीनगर येथे राजे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उद्यानाचे लोकार्पण

गांधीनगर येथे राजे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उद्यानाचे लोकार्पण
X

छत्रपती संभाजी महाराज यांचे असामान्य कर्तृत्व, असीम त्याग आणि गौरवपूर्ण इतिहासाच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक व उद्यानाचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा 300 च्यावर बालगोपालांच्या हस्ते वर्ध्यात आकर्षक रोषणाई, फटाक्यांच्या आतिषबाजित आणि चिमुकल्यांच्या किलबिलाटात पार पडला.

यावेळी प्रभागाचे नगरसेवक सोनल ठाकरे तसेच छत्रपती संभाजी महाराज समितीचे पदाधिकारी रामहरी कुटे, सुभाष साबळे, चंद्रभान आंबटकर,आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे उद्यान विविध रंगाच्या फुग्यांनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झेंड्यांनी सजविण्यात आले होते. यावेळी बालगोपालांना खाऊ आणि भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.

Updated : 21 Aug 2021 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top