Home > News Update > मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या काचांना तडे

मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या काचांना तडे

मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या काचांना तडे
X

Photo courtesy : social media

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनासह विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुणे शहरात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. मात्र मोदींच्या हस्त उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या काचांना तडे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी ऑनलाईन पेमेंट करून मेट्रोने प्रवास करुन मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर मोदींनी बोलताना मी भुमीपूजन केलेल्या कामाचे उद्घाटनही मीच केले असा दावा मोदी यांनी केला. त्यामुळे पुणे शहरात श्रेयवादाचे राजकारण रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यापार्श्वभुमीवर मोदींनी उद्घाटन केलेल्या मेट्रोच्या पिंपरी चिंचवड आणि फुगेवाडी येथील मेट्रोच्या दोन डब्यांच्या काचांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत उत्तर देतांना सांगितले की, मेट्रोच्या देखभालीसाठी सर्व पायाभूत सुविधा आमच्याकडे तयार आहेत. त्यामुळे त्याद्वारे मेट्रोची नियमीतपणे देखभाल होणार आहे. मात्र सध्या काचांना तडे कोणत्या कारणामुळे गेले याची तपासणी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवारी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरातील दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सेवा नागरीकांसाठी खुली करण्यात येईल. तसेच सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील दोन्ही मार्गिकेवरुन नागरीकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या काचांना तडे गेल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच मेट्रोची पुर्ण तपासणी न करताच मेट्रो सुरू करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत. तर याबाबत महाराष्ट्र देशा या वेबपोर्टलने वृत्त दिले आहे.

Updated : 6 March 2022 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top