Home > News Update > 'थोडे माय-बापासाठी पण' अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना

'थोडे माय-बापासाठी पण' अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना

थोडे माय-बापासाठी पण अभियाना अंतर्गत  ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना
X

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पहिल्या जेष्ठ नागरिक कक्षाचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी या ठिकाणी करण्यात आले.

यावेळी सेनगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस आर बेले,सभापती संतोष खोडके,सरपंच श्रीमती इंदूताई खडसे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पहिले ज्येष्ठ नागरिक कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सरपंच इंदुताई खडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे.

दरम्यान जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या कक्षात जेष्ठ नागरिकांसाठी दूरदर्शन संच, तसेच सर्व वृत्तपत्र आणि इतर पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याचे माहिती गटविकास अधीकारी एस आर बेले यांनी दिली.

वृद्धापकाळात एक विरंगुळा त्यांना या कक्षाच्या माध्यमातून मिळणार असून यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Updated : 30 Aug 2021 9:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top