Home > News Update > आमदार सुरेश धस यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ

आमदार सुरेश धस यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ

आमदार सुरेश धस यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ
X

बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वरून वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना धारेवर धरलंय. दरम्यान यावेळी आमदार सुरेस धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच गोंधळ घातला आहे. जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून जिल्हा प्रशासनाचं यावर कोणतंही नियंत्रण नाही. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. आणि यावेळी जिल्हाधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तब्बल 15 मिनटं आमदार धस आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु होता.

Updated : 23 April 2021 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top