Home > News Update > ठाण्यामध्ये राष्ट्रवादीने वाहनधारकांना गुलाबाचे फुल देऊन केलं अनोखं आंदोलन

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीने वाहनधारकांना गुलाबाचे फुल देऊन केलं अनोखं आंदोलन

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीने वाहनधारकांना गुलाबाचे फुल देऊन केलं अनोखं आंदोलन
X

गेल्या काही दिवसांपासुन सातत्याने इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. बुधवारी ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर ११२ रूपये प्रती लीटर इतका होता. याच्याच निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले. इतक्या महागाईतही इंधन भरणार्यार वाहनधारकांचा पेट्रोल पंपावरच राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला.

इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढ मागे घेण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे इंधन भरणार्याा वाहनधारकांना चक्क गुलाबाचे फुल देऊन तसेच त्यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

आज जर या महागाईविरोधात सामान्य जनता बंड करणार नसेल तर उद्या आपल्याला जगणेही असह्य होणार आहे. याची जाणीव वाहनधारकांना करून देण्यासाठी हे आंदोलन केले गेले. यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला.

Updated : 21 Oct 2021 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top