Home > News Update > किरीट सोमय्यांना धक्का..! नील सोमय्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला

किरीट सोमय्यांना धक्का..! नील सोमय्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला

बाप बेटे जेल जाएंगे म्हणत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांना अटक संजय राऊत यांनी इशारा दिला होता.

किरीट सोमय्यांना धक्का..!  नील सोमय्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला
X

संजय राऊत यांनी बाप बेटे जेल जाएंगे असे म्हणत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार अटक होऊ शकते. त्यामुळे किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने सोमय्यांची अटकपुर्व जामीन फेटाळून लावला.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडीत कलगितुरा रंगला आहे. तर भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाप बेटे जेल जाएंगे असे म्हटले होते. त्यानुसार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर केले होते. त्याबाबत नील सोमय्यांना अटक करण्यात येण्याची शक्यता होती. त्यामुळे नील सोमय्या यांनी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने सोमय्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला.

किरीट सोमय्या आणि संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. तर संजय राऊत लवकरच ईडीच्या कोठडीत जातील, असे सोमय्या म्हणाले होते. मात्र संजय राऊत यांनी बाप बेटे जेल जाएंगे म्हणत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना इशारा दिला होता. तर किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या हे पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान याचा पार्टनर असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. तर सोमय्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र या आरोपांना किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले होते.

संजय राऊत यांनी नील सोमय्यांवर आरोप करत मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे पुरावे सादर केल्याने नील सोमय्यांना अटक होण्याची भीती होती. त्यामुळे किरीट सोमय्या पुढील रणनिती ठरवण्यासाठी दिल्लीला गेले होते. मात्र आता न्यायालयाने नील सोमय्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. तर नील सोमय्या यांच्याविरोधात कोणतीही एफआयआर दाखल झाली नसल्याने त्यांना अटकपुर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.

Updated : 1 March 2022 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top