कोरोनाचा कहर : देशात कोरोना बळींची संख्या २० हजारांच्या वर

maharashtra coronavirus district wise tally
सौ. सोशल मीडिया

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 22 हजार 252 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता सात लाखांच्या वर गेलेली आहे. तर गेल्या चोवीस तासात 467 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 20 हजार 160 वर गेलेली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या सात लाख 19 हजार 665 एवढी झालेली आहे. यापैकी चार लाख 39 हजार 948 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. तर दोन लाख 59 हजार 557 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात आता कोरोनाच्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सोमवारी एका दिवसात दोन लाख 41 हजार 430 रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एक कोटी 2 लाख 9 हजार रुग्णांच्या चाचण्या देशभरात करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here