Home > News Update > Antilia bomb scare case: NIA ने खोलात जाऊन तपास केला नाही, मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केला संताप

Antilia bomb scare case: NIA ने खोलात जाऊन तपास केला नाही, मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केला संताप

Antilia bomb scare case: NIA ने खोलात जाऊन तपास केला नाही, मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केला संताप
X

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया (Antilia) या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं NIA (National Investigation Agency) अर्थात राष्ट्रीय तपास योजनेच्या तपासावरच नाराजी व्यक्त केली. अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि उद्योगपती मनसुख हिरेन हत्येचा (Mansukh Hiran death case) NIA ने केलेला तपास गोंधळात टाकणार आहे. या दोन्ही प्रकरणी खोलवर तपास झाला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणात मुंबई माजी पोलिस दलातील अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा चा (Encounter Specialist Pradeep Sharma) जामीन अर्ज फेटाळतांना न्यायालयानं ही नाराजी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि आर.एन.लड्डा यांच्या पीठानं म्हटलं आहे की, अँटेलिया निवासाबाहेर पार्किंमध्ये स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवणं याप्रकऱणाी एनआयएचा तपास व्यवस्थित झालेला नाही. NIA नं वरिष्ठ पोलिस अधिका-यांना याप्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, याप्रकरणी थेट तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह (IPS Parambir Singh) यांचंही नाव आलं होतं.

दोन न्यायमूर्तीच्या पीठानं स्कॉर्पिओ प्रकरणात इतर लोकांच्या सहभागासंदर्भात म्हटलंय की, अशाप्रकारचा कट रचणं ही एकापेक्षा जास्त लोकांशिवाय शक्य नाही. याप्रकरणातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या (Sachin Vaze) कटातील सहभागाविषयी NIA ने मौन का धारण केलं आहे? वाझे हाच याप्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यानेच स्कॉर्पिओमध्ये जिलेटीन ठेवलं होतं. मात्र, NIA चं म्हणणं आहे की, त्या वाहनात इतरांनी जिलेटीन ठेवलं होतं. मात्र असं असेल तरी या कटातील इतर सहभागी लोकांचं नाव अजूनही समोर आलं नाही, याकडेही न्यायालयानं (Bombay Highcourt) लक्ष वेधलं.

Updated : 24 Jan 2023 6:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top