Home > News Update > आज कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार

आज कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती परिस्थिती निवळत असताना राज्यातील अनेक भागात उघडीप झाली आहे. आज कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आज कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार
X

एका बाजूला अतिवृष्टी झाली असताना राज्यातील काही भागात अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

याबाबत बोलताना कृषी हवामान अभ्यासक अमोल कुटे म्हणाले,वायव्य मध्य प्रदेशात हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, त्याची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून कमी दाब क्षेत्राच्या केंद्रामधून बांग्लादेश, अरूणाचल प्रदेशकडे आहे. मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.




राज्यात ४ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरीसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा अधिक सर्वदूर पर्जन्याचा अंदाज निवृत्त हवामान शास्त्र माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. अद्यापही पर्जन्य झालेल्या भागात परतीच्या मानसून असाच मोठा पाऊस पडेल असा आहे त्यांचा अंदाज आहे.

राज्यात ४ ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

माथेरान ४०, मंडणगड ३०, दापोली, जव्हार, कर्जत, खालापूर, माणगाव, मोखेडा, मुलदे, राजापूर, रोहा, संगमेश्वर, देवरूख, सुधागड, पाली, ठाणे, वेंगुर्ला, वाडा प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र :

महाबळेश्वर ७०, लोणावळा, राधानगरी प्रत्येकी ४०, गगणबावडा ३०, इगतपुरी, नवापूर, पौड, पेठ प्रत्येकी २०.

विदर्भ :

अहेरी, भामरागड, कोर्पणा, मालेगाव प्रत्येकी ३०, आर्णी, बल्लारपूर, एटापल्ली, घाटंजी, गोंड पिंपरी, वाशीम, झारी झामनी प्रत्येकी २०.

घाटमाथा :

वळवण १४०, शिरगाव, दावडी प्रत्येकी ९०, ताम्हिणी ७०, डुंगरवाडी ६०, आंभोणे, भिरा प्रत्येकी ४०.

Updated : 4 Aug 2021 2:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top