Home > News Update > IFFI च्या मुख्य ज्युरींनीच काढली काश्मीर फाईल्सची इज्जत

IFFI च्या मुख्य ज्युरींनीच काढली काश्मीर फाईल्सची इज्जत

गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची सांगता झाली. यावेळी बोलताना IFFI च्या मुख्य ज्युरींनी काश्मीर फाईल्स चित्रपटाची पुरती इज्जत काढली.

IFFI च्या मुख्य ज्युरींनीच काढली काश्मीर फाईल्सची इज्जत
X

विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक मातब्बर अभिनेत्यांनी भूमिका केलेला काश्मीर फाईल्स चित्रपट गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. तसेच अनेक कलाकारांनी आपली मनोगतं आणि चित्रपट सृष्टीबद्दल भावना व्यक्त केल्या. मात्र यावेळी IFFI चे मुख्य ज्युरी असलेल्या नादव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर सडकून टीका केली.आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे मुख्य ज्युरी असलेले नादव लॅपिड म्हणाले की, या फेस्टिव्हलमधील 15 वा चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहून धक्काच बसला. आम्ही खूप अस्वस्थ झालो. कारण माझ्या मते एका विचारधारेचा प्रचार करणारा हा चित्रपट एक प्रोपगंडा आणि व्हल्गर चित्रपट आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या महत्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला स्थान मिळणे, ही मोठी खंत असल्याचं मत नादव लॅपिड यांनी व्यक्त केले.

नादव लॅपिड यांनी केलेल्या टिपण्णीनंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यातच विवेक अग्निहोत्री यांना नेटकऱ्यांनी टॅग करून याबाबत बोलण्याची विनंती केली आहे. त्याबरोबरच विवेक अग्निहोत्री यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

नादव लॅपिड यांनी केलेल्या टिपण्णीनंतर अनुपम खेर यांचा काश्मीर फाईल्समधील फोटो व्हायरल होत आहे.

Updated : 29 Nov 2022 5:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top