Home > News Update > मुंबई गोवा प्रवास करण्याच्या विचारात आहात ही बातमी वाचा मगच घरातून बाहेर पडा

मुंबई गोवा प्रवास करण्याच्या विचारात आहात ही बातमी वाचा मगच घरातून बाहेर पडा

मुंबई गोवा प्रवास करण्याच्या विचारात आहात ही बातमी वाचा मगच घरातून बाहेर पडा
X

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणार असाल तर विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. कोलाड येथील पुई म्हैसदरा पुलाच्या गर्डर बसविण्याच्या कामासाठी हा हायवे बंद राहणार आहे. 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान हे काम चालणार असल्याने या कालावधीत मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग बंद राहणार आहे. पण या कालावधीत सकाळीं 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 असा या वेळेव्यतिरिक्तच्या काळात प्रवास करता येणार आहे. या महामार्गावरून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी या वेळेनुसार प्रवासाचे नियोजन केल्यास त्यांचा त्रास वाचणार आहे..

यासाठी पर्यायी वाहतूकीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

मुंबईकडून गोव्याला जायचं झाल्यास खालील पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत

वाकन फाटा -भिसे खिंड -रोहा कोलाड असा प्रवास करावा लागणार

वाकण फाटा-पाली-रवाळजे-निजामपूर माणगाव-वरून मुंबई गोवा राष्ट्रिय महामार्गावर पोहचता येईल

खोपोली-पाली-वाकण-राष्ट्रीय महामार्ग क्र 548 ए मार्गावरून यायचं झाल्यास

पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाव वरून मुंबई गोवा महामार्गाला पोहचता येईल.

गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी खालील पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत


कोलाड-रोहा-भिसे खिंड- वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा हायवेला येता येईल

कोलाड-रवाळजे-पाली नंतर खोपोली राष्ट्रिय महामार्ग क्र 548 ए मार्गावरून जाता येइल

कोलाड-रवाळजे पाली - वाकण फाटा मार्गे मुंबई गोवा महामार्गाला वळवता येईल

Updated : 11 July 2024 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top