आरक्षण जर वाचवायचे असेल तर अगोदर संविधान वाचल पाहिजे
X
ही लुटारूनची व्यवस्था आहे, आरक्षणवाद्यानी आरक्षणवाद्याना मतदान केल पाहिजे. भाजप चा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे.आरक्षण जर वाचवायचे असेल तर अगोदर संविधान वाचल पाहिजे. संविधानच वाचल नाही तर आरक्षण कसे वाचेल असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ओबिसी च्या मेळाव्यात उपस्थित केला.
बारा बलुतेदारांच्या हातात सत्ता जाता कामा नये
प्रकाश आंबेडकर म्हणतात 'मी मोहन भागवतांची दोन-तीन वेळा भेट घेण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांची आणि माझी भेट होऊ दिली नाही. त्यांना मी निमंत्रण देणार होतो. या संविधांच्या माध्यमातून के वाईट आहे ?फक्त तेवढ लोकांना संगा पटल आम्हाला आम्ही तुमच्या बाजुचे, पटवू शकला नाहीत तर तुम्ही आमच्या बाजुचे पण आमणे सामणे येणार नाहीत याच कारण असे आहे की त्यांना बारा बलुतेदारांच्या हातात सत्ता द्यायची नाही.
महात्मा फुलेपासून शाहू महाराजा बाबासाहेबा पर्यन्त या सगळ्यांनी सामन्यांच्या हाती सत्ता आणून दिली सामान्य माणूस इथला सत्ताधारी होऊ शकतो. शिक्षणाची दार खुली करून उद्याची व्यवस्था उभी करू शकतो. अध्यक्षीय पद्धत आली तर या सोयी राहणार नाहीत. असे आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले
खाजगी शाळा सुरू होतील
प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात देवेंद्र फडणवीस २५००० प्राथमिक शाळा बंद करणार आहेत. खाजगी शाळा झाल्यास तुम्ही पन्नास हजार फिस भरु शकाल का असा सवाल सभे दरम्यान उपस्थित केला. १९९० च्या अगोदर तुमच्या घरात अधिकारी होता का ? ओबिसी ला आरक्षण मिळाल्याने ओबिसीतुन डॉक्टर,इंजिनिअर अधिकारीवर्ग तयार झाला हा बदल अरक्षणाने केला. म्हणून आरक्षण काढून घेतल जातय.
आधी १५ लाख देणार होतास ते दिले नाहीस
प्रकाश आंबेडकरांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे ते म्हणतात ; मोदीने २२ तारखेला दिवाळी साजरी करायला सांगितली आहे. माझ एवढंच त्याला म्हणण आहे, तू आम्हाला ५००/ ५०० रुपये दे मग आम्ही दिवाळी साजरी करू. तू आमचे खर्च कशाला करतोस? १५ लाख देणार होतास ते देऊ शकला नाहीस. ५००/५०० रु दे आमचे अकाऊंट आहेत. मोदीला माझी हात जोडून विनंती आहे, आम्ही २२ तारखेला दिवाळी करू पण तू आम्हाला ५०० ५०० रु दे असा टोला आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
तर एका बाजुला आड आणि एका बाजुला विहीर अशी भाजप ची स्थिति झाली आहे.
ओबिसी च्या मंचावर पहिल्यांदाच आपण येत आहात असा पत्रकारांनी प्रश्न केला असता ओबिसी चळवळच आम्ही सुरू केलीय मी थोडीच आता जातोय. आस उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले. छगन भुजबळ वगळता प्रकाश आण्णा शेंडगेसह अनेक ओबिसी नेते मंचावर उपस्थित होते






