Home > News Update > T20 World Cup : पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं तर ब्लँक चेक देणार; PCB ला उद्योगपतीची ऑफर 

T20 World Cup : पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं तर ब्लँक चेक देणार; PCB ला उद्योगपतीची ऑफर 

T20 World Cup : पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं तर ब्लँक चेक देणार; PCB ला उद्योगपतीची ऑफर 
X

भारत-पाकिस्तान संघादरम्यान या २४ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्याकडे आता जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे, कारण एका मोठ्या उद्योगपतीनं पाकिस्तान क्रिकेट मंडळाला ( PCB) या सामन्यावरून मोठी ऑफर दिली. २४ ऑक्टोबरच्या या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारताच्या संघाला पराभूत केल्यास ब्लॅंक चेक देण्याचं आश्वासन एका पाकिस्तानी उद्योगपतीने दिले आहे.

PCBचे नवीन अध्यक्ष रमीज राजा ( PCB chairman Ramiz Raja ) यांनी ही माहिती दिली.

दरम्यान पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू पाकिस्तानचा संघ कसा तगडा आहे आणि विराट कोहली अँड कंपनी कशी दुबळी आहे, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानला एकदाही टीम इंडियावर विजय मिळवता आलेला नाही. हे अवघ्या जगाला माहिती आहे तरीही पाकिस्तानकडून यंदा उलटफेर होईल असा दावा केला जात आहे. आतापर्यंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यात पाच सामने झाले आणि ते सर्व टीम इंडियानं जिंकले आहेत. दरम्यान २४ ऑक्टोबरच्या सामन्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे, या सामन्यासाठी तिकीट 1 तासातच विकली गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

Updated : 8 Oct 2021 1:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top