Home > News Update > 'देवेंद्रजी, तुम्ही दिल्लीत गेलात तर सगळ्यात जास्त आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होईल'

'देवेंद्रजी, तुम्ही दिल्लीत गेलात तर सगळ्यात जास्त आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होईल'

देवेंद्रजी, तुम्ही दिल्लीत गेलात तर सगळ्यात जास्त आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होईल
X

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकतात, तुम्ही लेखक होऊ शकतात त्यामुळे तुम्ही राजकारण सोडून हा विचार करायला हरकत नाही. तुमच्या या निर्णयामुळे आम्हालाही सुगीचे दिवस येतील असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले त्यावेळी अजित पवार बोलत होते. तसेच मी राम नाईक यांना विनंती करतो की त्यांनी दिल्लीत या बद्दल सांगावे. या ज्ञानाचा दिल्लीतही उपयोग होईल आणि असं झालं तर यात सर्वात आनंदी कोणी होईल तर सुधीर मुनगंटीवार असतील असा चिमटा देखील अजित पवार यांनी काढला.

नेमकं काय म्हणाले अजितदादा

योग्य पुस्तक योग्य वेळी येतेय याचा मला आनंद आहे. तसेच याचा उपयोग सामान्य नागरिकांसहित सर्वाना होणार आहे. सोप्या भाषेत अर्थसंकल्प कळवा यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. तसेच मला देखील या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. अर्थ संकल्प फक्त सोप्या भाषेत असून चालणार नाही तर अर्थ संकल्प मांडण्याचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

एवढेच नाही तर मला एक गोष्ट सांगायची आहे की अर्थसंकल्प मांडताना विरोधकांनी गोंधळ न घालता तो ऐकला पाहिजे. कारण मी सहावर्षांपूर्वी अर्थ संकल्प मांडत असताना विरोधक गोधळ घालत होते. तेव्हा फक्त देवेंद्र फडणवीस हे लक्ष पूर्वक ऐकत होते असे अजित पवार यांनी सांगितले.

Updated : 4 March 2020 3:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top